नव्या आयटी कायद्याचे फायदेः एका महिन्यात 20 लाख अकाउंट्स वर बंदी घालण्यात आली

शनिवार, 17 जुलै 2021 (09:47 IST)
जागतिक स्तरावर बंदी घातलेली 25 टक्के अकाउंट्स भारताचे असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप ने म्हटले आहे.व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर दरमहा सरासरी 8 दशलक्ष खाती बंदी घातली जातात.
 
सर्व सोशल मीडिया आणि टेक कंपन्यांनी भारत सरकारच्या नवीन आयटी कायद्याला विरोध केला होता, त्याच आयटी कायद्यानुसार भारतात एका महिन्यात 20 लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ने म्हटले आहे की त्याने 15 मे ते 15 जून दरम्यान हानिकारक असणाऱ्या कन्टेन्ट वर बंदी आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा हा पहिला कम्पलयांस अहवाल आहे. 
 
 
फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप ने म्हटले आहे की एका महिन्यातच त्याने 20,11,000 अकाउंट्स वर बंदी घातली आहे ज्यांच्या मोबाइल नंबरवर कंट्री कोड +91 आहे.हा कोड भारताचा आहे.जागतिक स्तरावर बंदी घातलेली 25 टक्के अकाउंट्स भारताची असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप ने म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर दरमहा सरासरी 8 दशलक्ष अकाउंट्स वर बंदी घातली जातात.
 
 
या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी का घालण्यात आली?
हानीकारक किंवा त्रासदायक सामग्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅप ने या खात्यांवर बंदी घातली आहे. उदाहरणार्थ, त्या खात्यांवर बंदी घातली गेली आहे ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांना स्पॅम संदेश पाठवले जात होते. याशिवाय त्या अकाउंट्सवरही बंदी घातली गेली आहे, ज्यां अकाउंट वरून लोकांना आक्षेपार्ह संदेश पाठविण्या बद्दल तक्रारी केल्या आहेत.अशीही काही अकाउंट्स आहेत ज्यांची ओळख  आक्षेपार्ह संदेश पाठविले म्हणून केली गेली आहे.
 
आपल्या  व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर बंदी घालता येईल का?
हो नक्कीच! व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासून काही गोपनीयता धोरणे आहेत आणि नवीन आयटी नियमानंतर,कायदे पूर्वीपेक्षा कठोर बनले आहेत.आपण लोकांना अधिक किंवा स्पॅम संदेश पाठविल्यास आपल्या खात्यावर बंदी घातली जाऊ शकते.याशिवाय आपल्यावर हिंसा भडकवण्यासाठी किंवा आक्षेपार्ह संदेश पाठविण्याबद्दलही कारवाई केली जाऊ शकते.
 
याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर जर आपण कोणाला धमकावल्यास किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अकाउंट्सवर बंदी येऊ शकते म्हणून आपणास आपले खाते सुरक्षित ठेवायचे आहे आणि त्यावर बंदी घालू नये अशी आपली इच्छा असल्यास, कोणालाही अनावश्यक संदेश पाठवू नका आणि आक्षेपार्ह आणि हिंसक संदेशांपासून दूर रहा.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती