पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (14:18 IST)
आपल्या देशातील अल्पसंखकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षणकरत नसल्याबद्दल अमेरिकेने पाकिस्तानचा निषेध केला. 27 देशांच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना अमेरिकेचे परराष्ट्रंत्रीय माइक पॉम्पिओ यांनी हे विधान केले. पाकिस्तानात हिंदूंबरोबर होत असलेल्या छळाचा त्यांनी उल्लेख केला. 
 
इराकमध्ये याझिदी, पाकिस्तानात हिंदू, बर्मामध्ये मुस्लीम आणि नाजेरियात ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंखकांना लक्ष्य करणार्‍या दहशतवादी, कट्टरपंथीयांचा आम्ही निषेध करतो असे पॉम्पिओ म्हणाले. पाकिस्तानात हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत.
 
लग्नासाठी हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्या पार्श्र्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युनायटेड किंगडम, इस्रालय, युक्रेन, नेदरलँड आणि ग्रीस हे प्रमुख देश आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेचे सदस्य आहेत. अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असेल असे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती