कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक देशांनी चीन बरोबर व्यापार कमी केला आहे. अनेक विमान कंपन्यांनी चीनमध्ये उड्डाणे बंद केली आहेत. जनरल मोटर्स, अॅपल, स्टारबक्स या जगविख्यात कंपन्यांनी चीनमधील आपलं काम तूर्तास बंद केलं आहे.
कोरोनाविषाणूमुळे फक्त चीनच नाही अन्य देशांच्या शेअर बाजारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला असून, १५ हजारपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.