भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. येथे पीएम मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी झाले होते. बिडेन यांनी मोदींचे विल्मिंग्टन, डेलावेअर येथील निवासस्थानी स्वागत केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. यानंतर बिडेन यांनी मोदींचा हात धरला आणि त्यांना त्यांच्या घरात नेले जेथे द्विपक्षीय चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांनाही खास भेट दिली
पीएम मोदींनी जो बिडेन यांना चांदीचे हाताने कोरलेले ट्रेनचे मॉडेल भेट दिले आहे. या सिल्व्हर ट्रेन मॉडेलची खास गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्रातील कारागिरांनी तयार केले आहे. चांदीचे संपूर्ण काम हाताने केले आहे. ट्रेन बनवण्यासाठी 92.5 टक्के चांदीचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या ट्रेनच्या मॉडेलवर 'दिल्ली-डेलावेअर' देखील लिहिलेले आहे.