सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलींना एका दुकानाला कुलूप लावून कोंडले आहे. त्या बाहेर पडण्यासाठी आवाज करत आहे. बाहेर उभे असलेले काही लोक व्हिडिओ बनवत आहेत आणि थट्टा करत आहेत. हा व्हिडीओ लंडनचा असून त्यात दिसत असलेल्या मुली पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार कथितपणे लंडनमधील एका दुकानात कबाब चोरल्याच्या आरोपाखाली मुलीला कोंडण्यात आले.
कबाब चोरताना मुली पकडल्या
व्हायरल व्हिडिओनुसार, दोन्ही मुली एका दुकानातून कबाब चोरून पळ काढत होत्या, त्यानंतर त्या दुसऱ्या दुकानात शिरल्या. मात्र दुकान मालकाला संशय आल्याने त्यांनी दुकानाला कुलूप लावले. यानंतर दोन्ही मुली दुकानात आरडाओरडा करताना दिसतात.