ब्राझीलच्या दोन उत्तरेकडील राज्यांना जोडणारा पूल कोसळल्याने किमान दोन जण ठार झाले असून डझनभर बेपत्ता असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. सल्फ्यूरिक ऍसिडच्या गळतीमुळे बचाव कार्य गुंतागुंतीचे झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी मिळवलेल्या फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की रविवारी जेव्हा कार आणि ट्रक 'जुसेलिनो कुबित्शेक डी ऑलिव्हेरा' पूल ओलांडत होते तेव्हा पुलाचा मोठा भाग नदीत पडला
मारनहाओ आणि टोकँटिन्स या उत्तरेकडील राज्यांच्या सीमेवर काम करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, चार ट्रक, दोन कार आणि दोन मोटारसायकलींसह आठ वाहने बेपत्ता आहेत. पोलीस आणि ब्राझीलच्या रस्ते विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सांगितले.