'वीर मराठे' महाराष्ट्राची शान... प्रत्येक मराठीचा अभिमान

मंगळवार, 9 एप्रिल 2024 (13:25 IST)
'जेव्हा इरादे मजबूत असतात, तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखा दिसतो'.... हे प्रेरणादायी विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आणि खरोखर त्यांची प्रत्येक कृती तरुणांना प्रेरणा देणारी आणि अख्खं आयुष्य बदलणारी आहे. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे शूर पुत्र, महान देशभक्त आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू स्वराज्याचे संस्थापक होते. मराठ्यांचे वेगळे राज्य हवे हे स्वप्न बाळगून छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सैन्य उभारण्यास सुरुवात केली. त्यांची युद्धनीती आणि नेतृत्व क्षमता अप्रतिम होती. त्यांच्या विचारांमध्ये इतका उत्साह आणि ऊर्जा भरलेली होती की त्यांचे विचार आजच्या तरुणांना यश मिळवण्यासाठी प्रेरित करतात.
 
अखंड भारतावर राज्य करणाऱ्या मराठ्यांचा इतिहास तरुणांना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी अनेकांना याबद्दल पुरेपुर माहिती असली तरी मराठा साम्राज्याचा सुवर्ण इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. अखंड भारतावर राज्य करणाऱ्या मराठ्यांचा इतिहास...ज्यात विजेसारखी तलवार चालवणारे, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन देणारे, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा काढणारे, हजारो सैतानांवर भारी पडणारे मुठभर मावळे... ज्यांना स्वर्गात गेल्यावर देवांनी देखील झुकुन मुजरा केला असावा अशा मर्द मराठा मावळ्यांबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल आणि आपल्या गौरवशाली इतिहासातील घटना समोर आणण्याची गरज आहे ज्याने तरुण पिढीमध्ये स्वाभिमान जागृत व्हावा.
 
'वीर मराठे' या श्रृंखलेत पुन्हा एकदा ओळख करुन देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्याबरोबर लढणारे मर्द मावळे जे महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे स्वाभिमान आहे त्यांच्याबद्दल जे आजही शाबूत आहे. स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात ज्यांनी दिलेल्या योगदानाला तोड नाही. ज्यांच्या वीरतेचे प्रसंग ऐकून छाती गर्वाने अधिकच फुलते. स्वराज्यासाठी आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती