Soul after suicide आत्महत्या केल्यानंतर आत्मे बरोबर काय होत?

शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (23:01 IST)
वर्तमान काळात जीवनात एवढी धावपळ असते कारण प्रत्येकाला पुढे जायचे आहे पण जर कोणी रेसमध्ये मागे राहून जात तर तो एवढा निराश होऊन जातो आणि त्याच्यासमोर आपले जीवन सोडण्याशिवाय कुठलाही पर्यायच राहत नाही. आत्महत्या, समाजाचे एक मोठे कडू सत्य ज्याचे बरेच कारण असू शकतात - वित्तीय, मानसिक, शारीरिक आणि भावनात्मकरूपेण त्रास असल्याने व्यक्ती आत्महत्या करून घेतो.  
 
बर्‍याच वेळा एखाद्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहामुळे एवढा मोठा धक्का बसतो आणि त्या व्यक्तीला सर्व काही निरस वाटू लागत आणि त्या परिस्थिती तो आपले प्राण त्यागतो. हिंदू धर्मातील 18 पुराणांमधील एक गरूड पुराणात मृत्यूचे प्रत्येक रूप आणि त्याच्या नंतरच्या जीवनाचे वर्णन करण्यात आले आहे. आत्महत्येबद्दल त्यात ही बरेच काही वर्णन करण्यात आले आहे.  
 
प्रत्येकाला माहीत आहे की आत्महत्या करणार्‍या व्यक्तीला कुठे जागा मिळत असेल, स्वर्गात किंवा नरकात, किंवा त्याला कुठे अजून जावे लागते. असे बरेच प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला या लेखात देण्याचा प्रयत्न करू, जे खाली दिलेले आहे.  
 
काय होते आत्मे सोबत?
हा प्रश्न बर्‍याच लोकांच्या मनात येतो, या बाबत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त थेसोफिस्‍ट हेलेना पेत्रोवाचे म्हणणे आहे की, 'आत्महत्या, सर्वात मोठा अपराध आहे आणि याचा परिणाम, फारच वाईट असतो. ' तसेच याबद्दल मास्‍टर कुट हूमीचे म्हणणे आहे की जे लोक आत्महत्या करून घेतात याचा अर्थ असा नाही की ते पूर्णपणे मेले आहे, पण याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला शारीरिक रूपेण कुठलेही कष्ट आता या संसारात राहत नाही. आत्महत्या एक निंदनीय कार्य आहे ज्यात व्यक्ती संघर्ष न करता घाबरून आपला जीव देणे जास्त योग्य 
समजतो.  
 
आत्महत्येबद्दल हिंदू धर्माचे मत : भारतीय समाजात आत्महत्येला हेय दृष्टीने बघितले जाते. ज्या कुटुंबात एखादा सदस्य आत्महत्या करतो त्या कुटुंबाला भावनात्मक आघात बसतो आणि सामाजिक कलंकपण लागतो. लोक जास्तकरून परिवारातच दोष बघू लागतात. हिंदू धर्मात  आत्महत्येला निंदनीय मानले जाते, कारण धर्मानुसार बर्‍याच योनीनंतर मनुष्याचे जीवन मिळत आणि त्याला गमावून देणे मूर्खतेचे काम आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती