ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना सोडण्याचा प्रयत्न करा

शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (12:58 IST)
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या माणसांमध्ये या 7 पैकी एक ही गोष्ट असेल तर त्याला नेहमी दुःख आणि त्रास सहन करावा लागतो. या 7 गोष्टी शक्य तितक्या लवकर काढून टाकल्या पाहिजेत.
 
1. अती प्रेम - कोणत्याही गोष्टीची अती खूप वाईट असते. कोणाशीही एका मर्यादेपेक्षा अधिक प्रेम करणे चुकीचे आहे. यामुळेच बर्‍याचवेळा लोक अन्याय करून बसतात. म्हणून कुठल्याही गोष्टीची अती चांगली नाही आहे.
 
2. लोभ - लोभी व्यक्ती आपल्या फायद्यासाठी कोणालाही फसवू शकतो. अशाप्रकारचे लोक धर्म-अधर्माबद्दल काही विचार करत नाही. म्हणून प्रत्येकाने लोभापासून दूर राहवे.
 
3. गर्व - गर्वामुळे मानव इतरांनी दिलेला सल्ला कधीही स्वीकारत नाही तसेच आपली चूक देखील स्वीकारत नाही. अशा असा व्यक्ती आपल्या कुटुंबास आणि मित्रांना त्रास देणारा असतो. म्हणून गर्व हा मनुष्याचा शत्रू म्हणवला जातो.
 
4. काम - जेव्हा एखाद्या व्यक्तीवर काम भावना हावी होते तेव्हा तो चांगलं वाईट सर्व काही विसरून जातो. एखादी कामी व्यक्ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाशीही वाईट वागू शकतो. म्हणून काम भावना नेहमी नियंत्रणात ठेवली पाहिजे.
 
5. मोह माया - कोणासाठी जास्त मोह ठेवणे हे एखाद्या मनुष्याचे विनाशाचे कारण बनते. खूप जास्त मोह असल्यावर व्यक्ती योग्य अयोग्य यात अंतर करू शकत नाही, ज्यामुळे अनेकदा त्याला नुकसान देखील पत्करावं लागत.
 
6. क्रोध - रागात मनुष्य विचार न करता कोणालाही नुकसान पोहोचवू शकतो. रागात केलेल्या कार्यामुळे
लाजिरवाणे वाटते आणि बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.
 
7. व्यसन - व्यसन केल्यानंतर त्या व्यक्तीला चांगले आणि वाईट काही कळत नाही. नशेच्या अवस्थेत मनुष्य दुसर्‍याचे नव्हेतर स्वत:च देखील नुकसान करून घेतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती