जाणून घ्या, धनत्रयोदशीला कोणत्या राशीच्या जातकांनी काय खरेदी केली पाहिजे आणि का....
मेष- सोनं किंवा पितळ्याची भांडी खरेदी करा. याने आरोग्य चांगले राहील आणि धन संचय होईल.
वृषभ- चांदीची मूर्ती किंवा दागिने खरेदी करावे. याने जीवनातील चढ-उतारापासून वाचाल आणि कुटुंबात शांती राहील.
मिथुन- कांस्याचे भांडे खरेदी करावे. याने पैशांसंबंधी घेत असलेले निर्णय योग्य ठरतील आणि कोणत्याही प्रकाराच्या भ्रमात राहणार नाही.
कर्क- चांदीचे भांडे किंवा शिक्का खरेदी करा. याने संपत्ती क्रय करण्याचे योग बनतील आणि भावनांवर नियंत्रण राहील.
सिंह- तांब्याचे भांडे खरेदी करा. तांब्याचा पाण्याचा लोटा किंवा इतर कोणत्याही आकाराचे जल पात्र खरेदी करणे श्रेष्ठ ठरेल. याने आरोग्य चांगलं राहील आणि क्रोधापासून नियंत्रण राहील.
कन्या- चांदीचे दागिने खरेदी करणे सर्वश्रेष्ठ ठरेल आणि चांदीची माळ तर सर्वोत्तम ठरेल. असे केल्याने विवाह शीघ्र ठरेल आणि बुद्धी वाढेल.
तूळ- चांदीचे लक्ष्मी गणेश खरेदी करा. याने नोकरीत अडचणी दूर होतील. आणि नुकसान देखील होणार नाही.
वृश्चिक- तांबा किंवा पितळ्याची भांडी खरेदी करा ज्याने दांपत्य जीवन सुखी राहील आणि संतान पक्ष संबंधित अडचणी दूर होतील.
धनू- सोनं किंवा पितळ या धातूचा शिक्का किंवा मूर्ती खरेदी करणे योग्य ठरेल. याने स्वभाव संतुलित राहील आणि वर्षभर धन प्राप्त होऊ शकेल.
मकर- कांस्य किंवा जिंक या धातूचे भांड खरेदी करा. याने धन हानीपासून वाचता येईल आणि वाहन सुख मिळेल.
कुंभ- स्टीलचे भांडे खरेदी करा ज्याने धनासंबंधी काम सोपे होतील आणि आशा नसलेल्या ठिकाणून देखील धन वापसीचे योग बनतील.
मीन- चांदी किंवा तांब्याचे शिक्के खरेदी करा ज्याने आपले खर्च नियंत्रणात राहावे आणि कुटुंबातील वाद टळतील.