घराच्या सजावटीसाठी ठेवलेली झाडे नकारात्मक तर नाही?

वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक गोष्ट, मग एखादे शो-पीस असो वा सजावटीची वनस्पती, घराच्या सदस्यांना प्रभावित करते. काही वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि काही नकारात्मक. घरामध्ये सजावटीसाठी देखील झाडं ठेवले जातात. हे ठेवतानासुद्धा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण ते देखील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. घरामध्ये कोणत्या झाडे ठेवली पाहिजेत आणि कोणतीही नाही जाणून घ्या:
 
या गोष्टी लक्षात ठेवाव्या:
1. घरात काटेरी आणि ज्यातून पांढरे द्रव्य बाहेर पडत असतील असे रोपटे ठेवू नये. काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. गुलाबासारखे काटेरी झाडे लावायला हरकत नाही.
2. बॉन्सायी झाडं पण घरी तयार करू नये आणि बाहेरुनही आणू नये. बॉन्सायी झाडांमुळे घरात राहणार्‍या लोकांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात.
3. घर किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी फ्लॉवर पॉटमध्ये ताजे फुले घाला.
4. घरामध्ये प्लास्टिक किंवा रेशीम फुले देखील सजविली जाऊ शकतात पण वेळोवारी स्वच्छ करणे आवश्यक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती