जेव्हापासून गणेशोत्सव आरंभ झाला आहे तेव्हापासून एक गोष्ट चलनात आहे की आम्ही श्री गणेश प्रतिमा किंवा मूर्ती म्हणण्या किंवा लिहिण्याऐवजी सरळ गणेश नाव वापरतो. जसे मातीचे गणेश किंवा इको फ्रेंडली गणेश, किंवा गणपतीला कसे विराजित करायचे किंवा त्यांचे विसर्जन कसे करायचे.
परंतू हे चूक आहे. आम्ही सर्व गणेश भक्त आहोत. ज्याने आपली रचना केली त्याची रचना करणारे आम्ही कोण? आम्ही त्यांची प्रतिमा तयार करू शकतो पण त्यांना नाही. आम्ही त्यांना विसर्जित कसे करू शकतो, ते तर सदैव आमच्यासोबत उभे असतात.
म्हणूनच श्री गणेशाला निरोप दिला, मातीचा गणपती तयार केला, गणपतीची स्थापना केली अश्या सारखे वाक्ये न बोलता किंवा लिहिता त्याबरोबर प्रतिमा किंवा मूर्ती हा शब्द जोडायला विसरू नये.