1980 साली गोटखिंडी गावात खूप पाऊस पडला होता. त्यावेळी गणेश मूर्तीवर पाणी पडले होते. तेव्हा गोटखिंडीत हिंदू-मुस्लीम नागरिकांना गणेश मूर्ती कोठे ठेवायची असा प्रश्न पडला होता. तेव्हा मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती स्थापन करू असा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गेले 38 वर्ष मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा जोपासली जाते आहे. अशी माहिती गावकर्यांनी ठेवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. सार्या देशाने आदर्श घ्यावा असे कार्य गोटखिंडीमध्ये सुरू आहे.