सांगलीच्या स्वच्छतेसाठी मला काम कराचये: सई ताम्हणकर
सांगली- कोल्हापूरपासून सांगली अवघी चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक सर्वच क्षेत्रात अव्वल आहे. तरीही राज्यात सांगलीची अवस्था न घर का न घाट का झाली आहे. असे सांगत मला सांगलीच्या ब्रॅडींचसाठी काम करायचेय.
सांगली स्वच्छतेसाठी माझ्या फेस व्हॅल्यूचा उपयोग करायचाय त्यासाठी मला पैसे नकोत तर हातला काम आणि सांगलीकरांची साथ हवी आहे. अशा भावना सांगलीची कन्या आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हिने व्यक्त केल्या.
सांगलीत स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सईने स्वच्छतादूत म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.