गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात?

मंगळवार, 9 एप्रिल 2024 (12:00 IST)
गुडीपाडवा देशातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा काळ शुभ असल्याचे मानले जाते म्हणून या निमित्ताने महाराष्ट्रीयन लोकांच्या घरोघरी गुढी बांधण्याची पद्धत आहे. या दिवशी श्रीखंड आणि पुरी याचा नैवदे्य दाखवला जातो. तसेच या दिवशी एक विशेष काम म्हणजे सकाळी उठल्यावर कडुलिंब खाण्याची पद्दत देखील असते. ही प्रथा का आहे याचा विचार केला आहे का? कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे, त्यामागे कारण म्हणजे बदलत असलेले हवामान. हाच काळ असतो जेव्हा हवामानाचा रंग बदलतो आणि अनेक आजार सोबत घेऊन येतात. प्रत्यक्षात कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत शरीराला खूप फायदे देतात. याविषयी जाणून घेऊया-

कडुलिंब-
• जसजसा उन्हाळा येतो तसतसे त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो, कडुलिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते.
• कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
• मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
• उष्णतेमुळे पोटाशी संबंधित अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, कडुलिंब त्यापासून मुक्त होण्यास खूप मदत करते.
• हे संधिवात आणि स्नायू दुखणे किंवा हवामानातील बदलामुळे वाढणारी सूज यापासून आराम देण्यास मदत करते.
• सौंदर्य वाढवण्यात तसेच पोटाची चरबी कमी करण्यात सर्वात जास्त मदत करते.
• कोंडा, केस गळणे, खाज सुटणे, पुरळ इत्यादीपासून आराम मिळवून देण्यासाठी कडुनिंबाचा पर्याय नाही.

गुळ-
साखरेला गूळ हा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. केवळ याच निमित्ताने नाही तर वर्षभर सेवन केल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.
• आधीच म्हटल्याप्रमाणे, बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यावेळी अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. या कामात गुळाची खूप मदत होते.
• हे पचनशक्ती वाढवण्यासही मदत करते. तसेच साखरेच्या तुलनेत गूळ खाल्ल्याने आम्लपित्त होण्याची शक्यता कमी असते.
• गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पौष्टिक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात.
• तसेच गुळ संतुलित आहाराच्या श्रेणीत येतो. त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या बाबतीतही अनेक फायदे होतात. कारण गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा सुधारते.
 
त्यामुळे कडुलिंब आणि गूळ याचे सेवन करुन निरोगी राहणे सोपे आहे. मात्र मधुमेह रुग्णांनी केवळ कडुलिंबाचे सेवन केल्यास अधिक योग्य ठरेल.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती