विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला आहे. याच आनंदोत्सवात आणखीन भर पडली असून ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) देखील मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. या ज्येष्ठा गौरींचे स्वागत करण्यासाठी महिलादेखील सज्ज होत.
श्री गणराचे सोमवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. या गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच आगमनाची चाहुल लागली होती. यासाठी महिला देखील गेल्या काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. आज या महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी धडपडत असलच्या दिसून आल्या. या गौरींचे पारंपरिक पद्धतीने आणि सोन पावलाने आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. तसेच गौरीला सजविण्यासाठी या महिला परिश्रम घेत होत्या.
गौरीला सजविण्यासाठी लागणारे बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ तसेच सोन्याचे विविध प्रकारचे हारही बाजारात उपलब्ध होते. गौरीसमोर आकर्षक देखावे सादर करण्यासाठी महिलांचा लाकडी व चिनी मातीच्या खेळण्या खरेदी करण्यावरही विशेष भर दिल्याचे दिसून आले. चिनी मरतीची चिमणी, हत्ती, उंदीर, पोपट, गाय, सिंह, वाघ, तुलसी, ससे, कासव आदी आकर्षक खेळणी खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. तसेच गौरींसमोर ठेवण्यासाठी विविध फळे खरेदी करतानाही या महिला दिसून आल्या.
गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला. गेग्लया चार-पाच दिवसांपासून घराघरांमध्ये मिष्टान्न तयार करण्याची लगबगही सुरू होती. घराघरांत गौरींचे उत्साहात पूजा करण्यात येणार आहे.