राज्य सरकार एसटीने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचवणार

गुरूवार, 7 मे 2020 (09:22 IST)
राज्यातल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी राज्य सरकार एक वेबसाइट तयार करते आहे. इच्छुक नागरिकांना या वेबसाइटवर नोंदणी करून कुठून कुठून जायचे आहे याची माहिती द्यावी असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. २५ लोकांचा समुहाने बस सोडली जाणार आहे. या बस रस्त्यात कुठेही थांबा न घेता थेट जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. मात्र रेड झोनमधले नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील असेही त्यांनी सांगितले.
 
लॉकडाऊनमुळं राज्यभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची घरी जाण्याची सोय राज्य सरकार मोफत करणार आहे.  सुमारे १० हजार बस गाड्यातून या लोकांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहित राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती