महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 48 हजार 700 नवे रुग्ण, 524 जणांचा मृत्यू

सोमवार, 26 एप्रिल 2021 (22:00 IST)
महाराष्ट्रात सोमवारी (26 एप्रिल) कोरोनाचे 48 हजार 700 नवे रुग्ण आढळले, तर 524 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6 लाख 74 हजार 770 वर गेली आहे.
 
सोमवारी (26 एप्रिल) मुंबई मनपा क्षेत्रात 3840, ठाणे मनपा क्षेत्रात 749, पुणे मनपा क्षेत्रात 2666, तर नागपूर मनपा क्षेत्रात 3799 रुग्ण आढळले.
 
महाराष्ट्रात 26 एप्रिलला 71 हजार 736 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याचा रिकव्हरी रेट 82.92 % वर गेला आहे.
 
सध्या राज्यात 39,78, 420 व्यक्ती होम क्वारंटीनमध्ये आहेत तर 30,398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत.
 
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 43,43,727 झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती