या 10 टिप्स तुम्हाला प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळवून देतील

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:22 IST)
परीक्षा असो, रिव्हिजन आणि समस्या सोडवण्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.  काही टिप्स अवलंबवल्याने परीक्षेत पूर्ण गुण मिळतील.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 लहान ब्रेक घ्या-
सतत वाचले तर काहीच आठवत नाही. त्यामुळे ब्रेक घेणे आवश्यक आहे. दर तासाला 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. मग वाचायला बसा. 
 
2 कठीण विषयांसह प्रारंभ करा-
जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू कराल तेव्हा कठीण विषय घेऊन करा. मन ताजेतवाने झाले की जे काही वाचले ते आठवते.
 
3 अभ्यासक्रमाची काळजी घ्या-
एकाच विषयाचा अभ्यास करत राहू नका. तुमच्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करून अभ्यास करा. 
 
4 संतुलित आहार घ्या-
परीक्षेपूर्वी बाहेरील खाणेपिणे टाळावे. घरी शिजवलेले ताजे अन्न, फळे घ्या. असे अन्न खावे की ऊर्जा टिकून राहील. भरपूर पाणी घ्या. 
 
5 नोट्स बनवा-
सर्व महत्त्वाच्या मुद्यांच्या नोंदी करा. शेवटच्या वेळी पुनरावृत्ती करताना हे खूप उपयुक्त आहेत.
 
6 तणावग्रस्त होऊ नका-
विध्यार्थ्यांना तणाव येऊ शकतो. परीक्षेचा काळात अशा वेळी पालक किंवा शिक्षक तुमच्यावर सतत अभ्यास करण्यासाठी किंवा चांगले गुण मिळविण्यासाठी दबाव आणतात. तुम्ही फक्त तुमचे पूर्ण प्रयत्न करा, निकालाची काळजी करू नका. 
 
7 मॉडेल पेपर सोडवा-
मॉडेल पेपर सोडवल्याने तुम्हाला खूप मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला पेपर निर्धारित वेळेत सोडवण्याची सवय लागेल. 
 
8 सर्व समस्या सोडवा-
 कुठलाही विषय तुम्हाला समजत नसेल, त्यातील संबंधित शंका दूर करा. नंतर काहीही समस्या सोडवायला ठेवू नका. 
 
9 आत्मविश्वास राखा-
तुम्ही जे वाचले आहे त्यावर विश्वास ठेवा. मला सगळं येत आहे, असा विचार करून पेपर द्यायला जा. 
 
10 एक चेकलिस्ट तयार करा
पेपरच्या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी घेऊन जायचे आहे त्याची यादी तयार करा. त्यांना एका जागी ठेवा आणि मग तयारीला सुरुवात करा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती