CID ही सोनी टीव्ही वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या घरात आणि मनात घर केलं आहे. सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युमन हे पात्र शिवाजी साटम करत आहे. कुछ तो गडबड है दया. हे वाक्य त्यांची विशेष ओळख आहे.
ही मालिका 1998 मध्ये सोनी टेलिव्हिजनवर सुरु झाली आणि मालिकेने तब्बल 20 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 2018 मध्ये मालिका बंद करण्यात आली. आता 2024 मध्ये प्रेक्षकांच्या मागणीवरून निर्मात्यांनी सीआयडी पुन्हा आणले. आता या मालिकेतून एसीपी प्रद्युमन यांचा मृत्यू दाखवून शिवाजी साटम शोला निरोप देण्याची माहिती समोर आली आहे.
एका बॉम्बस्फोटात एसीपी प्रद्युमन यांचा मृत्यू होण्याचे दाखवण्यात येणार असून आता त्यांच्या जागी पार्थ समथान एसीपीची भूमिका साकारणार असल्याचे समोर येत आहे.
अभिनेता पार्थ समथान पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. या बाबत अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
पार्थने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर चित्रपटातून केली. पार्थ एकता कपूरची कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत अनुराग बसूच्या भूमिकेत दिसला. पार्थने 2024 मध्ये घुडाचढी या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्या सोबत संजय दत्त, खुशाली कुमार, रविना टंडन आणि अरुणा इराणी देखील प्रमुख भूमिकेत होते.