अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

शुक्रवार, 9 मे 2025 (10:40 IST)
Bollywood News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. अशा परिस्थितीत, आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.
ALSO READ: बॉलिवूडचा ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा, अभिनेता सुनील शेट्टी पासून विकी कौशल पर्यंत सर्वांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिल्या
तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या एका सैनिकाचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने भारतीय सैन्याला सलाम केला आहे आणि लिहिले आहे की, "आम्हाला आमच्या रक्षकांचा अभिमान आहे. जय हिंद." यासोबतच मलायका अरोरानेही पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याचे कौतुक केले. तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने भारतीय सैन्याचे कौतुक केले आणि लिहिले, "भारतीय सशस्त्र दलांसाठी सर्व प्रार्थना आणि शुभेच्छा. आपले रक्षण करणाऱ्या पुरुष आणि महिलांचा अभिमान आहे.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती