बॉलिवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता

सलमान खान नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता भाईजान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमानने अ‍ॅडशूटसाठी तब्बल 7 कोटींचं मानधन मागितले आहे. एक अ‍ॅडशूट करायला साधारण 3 ते 5 दिवस लागतात. सलमानने प्रत्येक दिवसासाठी 7 कोटी मागितले आहेत. एवढे जास्त मानधन घेणारा सलमान पहिलाच अभिनेता असावा. आतापर्यंत 3 ते 4 कोटी अ‍ॅडशूटसाठी दिले गेले आहेत. मात्र इतकी जास्त रक्कम पहिल्यांदाच देण्यात येणार आहे. 
 
सलमानने त्याची वाढती लोकप्रियता यामुळे ही रक्कम  मागितली असावी. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान सध्या 'राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात सलानसोबत दिशा पटानी दिसणार आहे. प्रभूदेव या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमात सलमान  एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या याचित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती