अरमान मलिक हा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आहे. गायक सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स ठेवतात. आता अरमान मलिकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठे अपडेट त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. दीर्घकाळाच्या मैत्रिणीशीनिगडित माहिती त्याने दिली असून तो आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्याने आपल्या मैत्रिणी सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने आपल्या जोडीदाराची ओळख जगाला करू दिली आहे.