सनी देओलच्या ' गदर-2 ' च्या यशानंतर 90 च्या दशकातील चित्रपटांचे सिक्वेल येणार

रविवार, 27 ऑगस्ट 2023 (17:29 IST)
गदर-2' चं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं असून यात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटानं 12 व्या दिवशीही बंपर कमाई करत एक नवा विक्रम रचला आहे.
 
चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अभिनेता सनी देओल भावुक झाला आणि त्यानं सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला की, “तुम्हा सर्वांचे आभार”
 
“तुम्हा लोकांना 'गदर -2' इतका आवडेल असं मला कधीचं वाटलं नव्हतं. तूमच्या प्रेमामुळं आम्ही 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.हे सर्व तुमच्यामुळेच घडलं आहे.तुम्हा लोकांना चित्रपट आवडला. तारा-सकीना आणि संपूर्ण परिवार तुम्हाला आवडला. तुमचे खूप खूप आभार.“
 
गदर-2 सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांच्या टॉप 10 यादीत दाखल झाला आहे. इतकेचं नाही तर कमाईच्या बाबतीत पठाण, आरआरआर, बाहुबली -2 , केजीएफ-2 ,रजनीकांतचा 2. 0 , बाहुबली, दंगल, संजू आणि पीके यांना मागे टाकलं.
 
टॉप 5 च्या शर्यतीत ' गदर 2 ' ची आघाडी
बॉक्स ऑफिसवर अनेकदा असं दिसून आलं आहे की अनेक चित्रपट पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करतात, पण जर एखाद्या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात तेच कलेक्शन दिलं तर तो हिट ठरतो. प्रख्यात समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतेच त्यांच्या ट्विटरवर ट्विट केलं असून, दुसऱ्या आठवड्यातील हिंदी चित्रपटांच्या कमाईचा संदर्भ देत ते म्हणाले की 'गदर 2 ' ची कमाई 90.47 कोटी होती. पठाण चित्रपट 63.50 कोटी , 'बाहुबली-2' ची 80.75 कोटी, KGF नं 52.49 कोटी , दंगल चित्रपट 73.70 कोटी , संजू 62.97 कोटी, या आकडेवारीवरून असं दिसून येतं की ' गदर-2 ' च्या तारा सिंहच्या ट्रकनं सगळ्यांना मागे टाकलं आहे.
 
22 वर्षांपूर्वी गदरचा ट्रेलर पाहिल्यानंतर टीकेला समोरं जावं लागलं होतं
 
 
अँग्री यंग मॅन तारा सिंहच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तर फिल्म इंडस्ट्रीतही या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
 
समीक्षकांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वजण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. पण 22 वर्षांपूर्वी गदर रिलीज होण्याआधीच अनेकांच्या टीकेला सामोर जावं लागलं होतं. काही महिन्यांपूर्वी अभिनेता सनी देओलनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होत की, 22 वर्षांपूर्वी जेव्हा गदर चित्रपटगृहात येणार होता, तेव्हा समीक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोक त्याचा ट्रेलर पाहत असत आणि काय मूर्खपणा केला आहे असं सांगायचे.
 
बऱ्याच वाईट गोष्टी लिहल्या गेल्या आणि असं म्हंटलं गेलं की हिंदी कमी पंजाबी पिक्चर जास्त दिसत आहे पण जेव्हा तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा तो इतिहास बनला, आजही लोक याची चर्चा करतात.
 
' गदर- 2' चित्रपटानं इतिहास रचला असं का म्हटलं जातं ?
फिल्म ट्रेंड विश्लेषक आणि समीक्षक गिरीश वानखेडे बीबीसीशी बोलताना सांगतात, " ' गदर- 2' रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबतीत टॉप 5 च्या यादीत होता. या यादीत बाहुबली , केजीएफ, आरआरआर, रजनीकांतचा चित्रपट 2.0 आणि त्यानंतर 'गदर 2' होता. पण या चित्रपटानं लगेचच दुसऱ्या आठवड्यात पाचव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर येऊन इतिहास रचला.
 
इतिहास रचला असं या साठी सांगितलं जातंय कारण इतर चित्रपट बनवण्याचं बजेटही जास्त होतं पण ' गदर-2 ' चं बजेट 80 कोटी होतं आणि एखादा चित्रपट 80 कोटींमध्ये बनला आहे आणि कमाई मात्र 400 कोटींपेक्षा अधिकची करतो हे कौतुकास्पद आहे. ' गदर- 2 ' एवढयावर थांबणार नाही तर 500 कोटींचा आकडा पार करेल. "
 
' गदर- 2' नंतर 80 आणि 90 च्या दशकातील चित्रपटांच्या सिक्वेलची तयारी
 
' गदर- 2' ला प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळत आहे की या चित्रपटानं 80 आणि 90 च्या दशकातील कलाकारांना नवा जन्म दिला आहे. सनी देओल हा 40 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. या 40 वर्षांत त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यात काही चित्रपट चालले तर काही चालले नाहीत. पण सनी देओलच्या मागील 22 वर्षांबद्दल बोललो तर सनी देओलनं 33 चित्रपट केलं. यात फक्त 22 वर्षांची चर्चा केली तर त्यातला फक्त एक हिट झाला.
 
' यमला पगला दिवाना ' आणि देओल कुटुंबातील 'अपने' आणि 'चूप' हे दोन चित्रपट सरासरी म्हणता येतील. बाकीचे चित्रपट फ्लॉप होते. म्हणजे सनी देओलचे 30 चित्रपट फ्लॉप झाले होते, गदर 2 ' च्या यशानंतर 90 च्या दशकातील सिनेमाला नवी उमेद मिळाली आहे.
 
चित्रपट दिग्दर्शूक अनिल शर्मा यांचे मागील सर्व चित्रपट फ्लॉप ठरले होते .पण आता त्यांना यश मिळालं आहे. फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना पुन्हा एकदा सनी देओलची आठवण येऊ लागली आहे. केवळ सनी देओलच नाही तर आता पुन्हा एकदा 90 च्या दशकांतील सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा बॉर्डर -2 बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
एवढंच नाही तर सुभाष घई यांच्या 1986 मध्ये आलेल्या कर्मा चित्रपटांचा सिक्वेल बनवण्याची चर्चा आहे. 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांचा 'खलनायक' या चित्रपटाचाही सिक्वेल बनवला जाईल. या सिक्वेलमध्ये 64 वर्षांचा संजय दत्त पुन्हा एकदा दिसणार आहे. म्हणजे जुन्या कलाकारांचे पुन्हा एकदा चांगले दिवस सुरु झाले आहेत.
 
90 च्या दशकातील सुपरस्टार जेव्हा एकत्र येतात
गिरीश वानखेडे सांगतात की, " जुन्या कलाकारांचे चांगले दिवस याचा अर्थ म्हणजे गेल्या 2 महिन्यांत करण जोहरचा 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' , रजनीकांतचा जेलर ,पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमारचा ' ओह माय गॉड -2 ' हे सर्व चित्रपट यशस्वी ठरले. त्यांनी चांगली कमाई केली."
 
या चित्रपटांच्या यशामुळं प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडे वळू लागल्याचं दिसून येतं. या बदलामुळं चित्रपटसृष्टीत नवी ऊर्जा भरली आहे. जुने चित्रपट ज्यांना आपण ऐतिहासिक चित्रपट मानतो, त्यांची सध्या जोरात चर्चा होत आहे. त्या चित्रपटांच्या पुनर्निर्मितीबाबत चर्चा सुरू झाली आहे, बरेचदा असं दिसून येतं की या देशात लोक ट्रेंड फॉलोअर्स आहेत, एखादी गोष्ट हिट झाली की आपण त्याच्या मागे धावू लागतो.
 
हा आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा जुना फॉर्मुला आहे. एकदा साऊथचे सिनेमा हिट झाले की त्यांच्या चित्रपटाचे रिमेक बनू लागले आणि आता 90 च्या दशकातील चित्रपट आणि नायक पुन्हा हिट झाले की लोक त्यांच्या मागे धावतील. 90 च्या दशकातील सुपरस्टार सलमान खान,शाहरुख खान, अक्षय, अजय सर्वांनी सनी देओलचं अभिनंदन आणि कौतुक केलं. सनी देओलही या सर्वांचं त्यांच्या फिल्मच्या वेळी कौतुक करतोच .
 
अभिनेता सलमान आणि शाहरुख यांची एकमेकांच्या चित्रपटांच्या वेळी विशेष उपस्थिती दिसून आली आहे.
 
60 च्या दशकात दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद एकमेकांच्या चित्रपटांची स्तुती करत, त्यांना प्रमोट करायचे. पण राजेश खन्ना , अमिताभ बच्चन , विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबतीतही तेच दिसत नव्हतं. 80 आणि 90 च्या दशकातही असं घडलं नाही. पण आता अचानक अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान हे सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत आणि एक सकारात्मक ऊर्जा आणत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे.
 
आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल-2' आणि शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटावर सर्वांच्या नजरा
चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांच्या वाटचालीबाबत गिरीश वानखेडे सांगतात की, " नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यशानं इंडस्ट्रीत नवा उत्साह संचारला आहे.साऊथच्या चित्रपटांचे रिमेक आणि ओटीटी यांना प्रेक्षक कंटाळले होते. पण गदर-2 आणि ' ओह माय गॉड-2 ' नं एक नवा उत्साह संचारला आहे."
 
चित्रपट निर्मितीत पुन्हा स्क्रिप्ट आणि सशक्त कथेसाठी काम करू लागले आहेत. गदर-2 पाहण्यासाठी लोक अजूनही सिनेमागृहात जात आहेत. ओटीटी आल्यानं थिएटर संपेल असं म्हणणारे लोक आज चुकीचे ठरले आहेत. गदर-2 आता आयुष्मानचा ' ड्रीम गर्ल-2' आणि त्यानंतर शाहरुख खानचा ही चित्रपट येतं आहे. या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना तितकीचं उत्सुकता आहे.
 
पठाण नंतर आता शाहरुख खानच्या जवानची चर्चा सुरू झाली असून लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मला असं वाटतं की लोक चांगला सिनेमा हा थिएटर मध्ये जाऊन पाहणं पसंत करताहेत. सनी देओल आणि अमिषा पटेलचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'गदर'चा सिक्वेल 'गदर-2' हा 11 ऑगस्ट रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित झालाय. उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर, मनीष वाधवाही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 




Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती