अल्पावधीतच या व्हिडिओला 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते सलमान खानच्या गाण्याचं कौतुक करत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, सलमान खानने ज्या पद्धतीने हे गाणे गायले आहे, ते पाहता सलमानला लतादीदींची मनापासून आठवण येत असल्याचे दिसते.त्याच्या चेहऱ्यावर दुःख असल्याचे दिसत आहे.
92 वर्षीय लता मंगेशकर दीर्घकाळ आजारी होत्या, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता तसेच त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. नंतर त्यांचा कोविड निगेटिव्ह आला, पण असे असूनही त्यांना खूप अशक्तपणा आला होता आणि वाढत्या वयामुळे किरकोळ समस्या कायम होत्या.