‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून सिनेमाचं नाव ‘धडक’ असेल.
 
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असून डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘धडक’ 6 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
करण जोहरने ट्वीट करुन सिनेमाचं पोस्टर लाँच केलं आहे.हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती