मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसांनी बॉलिवूड गायक आणि रॅपर बादशाह विरोधात एफआयआर दाखल केला आहे. बादशाहवर ख्रिश्चन धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. खरंतर, नुकतेच बादशाहचे 'वेलवेट फ्लो' हे गाणे रिलीज झाले. ज्यामध्ये चर्च आणि बायबल सारखे शब्द चुकीच्या संदर्भात वापरले गेले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बुधवारी पंजाब पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आणि तक्रार नोंदवली.