तसेच श्रेयाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, अलिकडच्या आणि दुःखद घटना लक्षात घेता, कलाकारांसह आयोजकांनी या शनिवारी २६ एप्रिल रोजी सुरतमध्ये होणारा आगामी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या या दुःखाच्या काळात, देशभरातील कलाकार त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलत आहेत किंवा रद्द करत आहे.