राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत केले रजनीकांत यांचे अभिनंदन

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (21:40 IST)
सुपरस्टार रजनीकांत यांना सीनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजनीकांत यांचं कौतुक केलं आहे. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत रजनीकांत यांचं अभिनंदन केलं.
 
“रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन,” असं राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती