नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं या मागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पण नितीन देसाई यांच्यावर खूप मोठं कर्ज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्टुडिओतील एका कर्मचाऱ्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनला फोन करून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. तर त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या फॉरेन्सिक टीमने त्यांनी ज्या खोलीत गळफास घेतला त्या खोलीची पाहणी केली. त्या दरम्यान पोलिसांना नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही, पण त्यांना काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडली आहेत. “या तपासात आम्ही एकेक पाऊल टाकत आहोत. फॉरेन्सिक टीमचं काम पूर्ण झालं की नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल,” असं पोलिसांनी बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितलं.