बॉलीवूडमधील स्टार्सच्या घटस्फोटाच्या बातम्या आता एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि आता या यादीत अभिनेता फरदीन खानचे नाव देखील जोडले गेले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक चालले नाही. चर्चा अशी आहे की हे जोडपे विभक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड अभिनेता फरदीन खानबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याचे वैवाहिक जीवन चांगले जात नसल्याचे बोलले जात आहे.काही काळ फरदीन खान आणि नताशा वेगळे राहत होते, जिथे फरदीन खान त्याच्या आईसोबत मुंबईत राहतो आणि नताशा लंडनमध्ये राहते.
नताशा माधवानी ही 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध सुपरहिट नायिका मुमताजची मुलगी आहे. तीच मुमताज, जिने राजेश खन्ना ते धर्मेंद्र यांच्यासोबत खूप काम केले. 1974 मध्ये मुमताजने मयूर माधवानीसोबत लग्न केले. या दोघांना तान्या आणि नताशा या दोन मुली आहेत.
दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघे वेगळे राहून एक वर्ष झाले. तथापि, फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्यात मतभेद कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांवर फरदीन किंवा नताशा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.