केके यांच्या निधन, पंतप्रधान मोदी म्हणाले- कायम लक्षात राहतील; गृहमंत्री, उपराष्ट्रपतींनीही शोक व्यक्त केला

Webdunia
बुधवार, 1 जून 2022 (08:47 IST)
प्रसिद्ध बॉलिवूड गायक कृष्णकुमार कुननाथ (केके) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. केके यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विट केले की, “प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या गाण्यांमध्ये अभिव्यक्तीची व्यापकता आहे. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.'

संबंधित माहिती

पुढील लेख