बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन

रविवार, 25 फेब्रुवारी 2018 (09:00 IST)
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. संजय कपूर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या आपल्या कुटुंबियांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या.
 
त्यांच्या पश्‍चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी या सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवाह याच्या लग्नासाठी गेल्या होत्या. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2013 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती