बॉलीवूड मधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांना बाळ झाल्यानंतर तिला सोशल मीडिया पासून दूर ठेवले होते.
अनेकवेळा पापाराझी तिचा फोटो घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांनाही राहाचा चेहरा दाखवला जात नव्हता. आज रणबीर-आलियाने त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसचं खास गिफ्ट दिलं आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने आज वर्षभराने पहिल्यांदाच रणबीर-आलियाने लेकीचा चेहरा पापाराझींसमोर दाखवला. यावेळी राहाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता आणि त्यावर खास ख्रिसमस ट्रीचं डिझाइन केलेलं होतं. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यामध्ये राहा आलियासारखी दिसत असून, तिचे डोळे कपूर कुटुंबीयांप्रमाणे घारे असल्याचं पाहायला मिळत आहे.
राहाच्या या व्हिडीओवर “राहा खूपच गोड आहे”, “राहा आपल्या आजोबांसारखी दिसते”, “किती सुंदर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.