मृत समुद्र कुठे आहे?
जगप्रसिद्ध मृत समुद्र त्याच्या खाऱ्या पाण्यासाठी ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याच्या नावामागेही एक रहस्य लपलेले आहे. खरंतर या समुद्राचे पाणी इतके खारट आहे की त्यात कोणताही सजीव प्राणी जगू शकत नाही. त्यात झाडे आणि वनस्पती देखील जगू शकत नाहीत. जर तुम्ही त्यात कोणत्याही प्रकारचा मासा सोडला तर तो लगेच मरेल. या समुद्राच्या पाण्यात पोटॅश, ब्रोमाइड, झिंक, सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे आढळतात.