अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सोडणार का? नवीन होस्टच्या नावावर सोशल मीडियामध्ये चर्चा
बुधवार, 12 मार्च 2025 (16:22 IST)
कौन बनेगा करोडपती हा टीव्ही इतिहासातील सर्वात यशस्वी शोमध्ये समाविष्ट आहे. कौन बनेगा करोडपती (KBC) हा गेम शो 3 जुलै 2025 रोजी 25 वर्षे पूर्ण करेल.2007 मध्ये शाहरुख खानने होस्ट केलेल्या केबीसीच्या तिसऱ्या सीझनचा अपवाद वगळता अमिताभ बच्चन गेल्या 25 वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन करत आहेत.
बिग बी सध्या केबीसी 16 चे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत, जो 12 ऑगस्टपासून सुरू झाला आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे. गेल्या सात महिन्यांत 150 हून अधिक भाग लाईव्ह झाले आहेत. हा शो सोनीलिव्हवर प्रसारित होत आहे.
अमिताभ बच्चन हा शो 2000 पासून होस्ट करत आहे. या शो ने अलीकडेच 25 वर्ष पूर्ण केले आहे. आपल्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी अमिताभ हा शो सोडत असून आता कोण होणार नवीन होस्ट या साठी सर्वे केला गेला असून शाहरुख खान हा आवडता पर्याय मानले जात आहे.
तसेच माजी क्रिकेटपटू धोनीला ही केबीसीचे नवीन होस्ट म्हणून पसंत केले जात आहे. हे सर्वेक्षण रेडिफ्युजन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅण्ड्स यांनी केले होते. या मध्ये एकूण 768 लोकांनी भाग घेतला होता. या मध्ये 408 पुरुष आणि 360 महिलांचा समावेश होता.