तसेच अलका यांचा चित्रपटांमध्ये गाण्याचा प्रवास ९० च्या दशकात सुरू झाला. अलकाला गायनाचा पहिला ब्रेक फक्त १४ वर्षांचा असताना मिळाला. बॉलिवूडमध्ये, गायिकेने 'पायल की झंकार' चित्रपटात तिचे पहिले गाणे 'थिरकट अंग लचक झुकी' गायले आणि त्यानंतर लवकरच अलकाला तिचे दुसरे गाणे मिळाले. त्यानंतर अलकाला पार्श्वगायिका म्हणून ओळख मिळाली. अलकाने आतापर्यंत २०,००० गाणी गायली आहे. तसेच अलकाचे वैवाहिक जीवन विशेष चांगले नव्हते. अलका यांनी १९८९ मध्ये नीरज कपूरशी लग्न केले होते परंतु गेल्या ३१ वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहे.