अभिनेता सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. त्याचे चित्रपट शेकडो कोटींचा व्यवसाय करतात. दबंग आणि टायगर चित्रपटांनंतर नंतर सलमान खान बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय झाला पण एक काळ असा होता जेव्हा सलमान त्याच्या घसरत्या करिअर ग्राफशी झुंजत होता. सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट बंपर हिट ठरला. 'तेरे नाम' हा चित्रपट सलमान खानच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यामुळे अभिनेत्याच्या कारकिर्दीला नवीन पंख मिळाले. अभिनेता सलमान खान म्हणाला की, सर्वांनी मला या चित्रपटात काम करण्यास मनाई केली होती पण मी स्वतःला रोखू शकलो नाही. तो म्हणाला, एके दिवशी मला खूप ताप आला आणि माझ्या दुसऱ्या चित्रपटाचे निर्माते मला शूटिंगसाठी बोलावण्यावर ठाम होते. सलमान खान म्हणाला की, अशा परिस्थितीत मला राग आला आणि मी वॉशरूममध्ये जाऊन माझे डोके मुंडले. यानंतर मी सुनीलला फोन केला आणि त्याला सांगितले की मला तुमचा चित्रपट करायचा आहे आणि मी माझे केसही मुंडवले आहे.