संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

रविवार, 16 मार्च 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच वारकरी संप्रदायातील एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. संत तुकाराम महाराज हे इ. स. 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. स. 1598 साली महाराष्ट्रातील देहू या गावी झाला होता. आज आपण संत तुकाराम महाराज यांचे गाव देहू याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील या ठिकाणी नक्कीच भेट द्या.   
ALSO READ: संत तुकाराम यांचे सुविचार
श्री तीर्थक्षेत्र देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक गाव आहे. तसेच विठ्ठलाचे परम भक्त संत तुकाराम महाराज यांचे देहू हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार संत तुकाराम महाराज या गावातूनच वैकुंठाला गेले होते. तसेच देहू गावाजवळ भंडारा डोंगर देखील आहे जिथे संत तुकाराम महाराज एकांतात झाडाखाली बसून अभंग रचना करायचे. तेच अभंगा आज देखील महाराष्ट्र भक्तीच्या बागा फुलवत आहे. तसेच हा भंडारा डोंगर देहू पासून अवघ्या सहा कमी अंतरावर आहे. देहू येथे गेल्यावर तुम्ही नक्क्कीच या डोंगराला भेट देऊ शकतात. तसेच हा डोंगर भक्तांसाठी पूजास्थळ बनले आहे. अनेक भक्त या डोंगरावर पूजा करतात.
ALSO READ: ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)
तसेच देहू मधील इंद्रायणी नदी देखील तुम्ही पाहू शकतात. हीच ती इंद्रायणी नदी आहे जिने तुकोबांची गाथा परत केली होती. तुकोबांना त्यावेळी विरोध करणारे पुष्कळ होते. आख्यायिकेनुसार एकदा तुकोबांची गाथा तेथिल काही टीकाकारांनी इंद्रायणीमध्ये विसर्जित केली. पण अखंड पुण्याई आणि विठ्ठलावरील अपार प्रेमभक्ती, अध्यात्मिक शक्तीमुळे तुकोबांची गाथा बुडली नाही तर तरंगून पुन्हा वर आली.  

तसेच देहू गावात तुम्ही वृंदावन, विट्ठल मंदिर, चोखामेळा मंदिर  हे देखील धार्मिक ठिकाणे पाहू शकतात. तसेच आता इंद्रायणी नदीच्या किनारी आता नवीन गाथा मंदिर बनवण्यात आले आहे. तसेच मंदिरातील आतील भाग संगमवरी दगडांनी बनवून त्यावर  संत तुकाराम महाराज यांच्ये अभंग सजवण्यात आले आहे.
ALSO READ: श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती
आज 'तुकाराम बीज' आहे अर्थात संत तुकाराम महाराज यांवैकुंठाला जाण्याचा दिवस होय. भक्तांना या महान संतांच्या चरणाजवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रसंग होय. संत तुकाराम महाराज यांची शिकावण आज देखील प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवते. संत तुकाराम महाराज हे दयाळू होते, कृपा सागर होते.  

तसेच संत तुकाराम महाराज शरीरासह वैकुंठाला गेले. संत तुकाराम महाराज हे एक असे विठ्ठल परम भक्त होते ज्यांनी मनुष्य असून वैकूंठाला स्वशरीर सोबत जाण्याची पुण्याई मिळवली होती. यावरून आपल्याला समजते की, ते मानव न्हवते तर मानवी रूपात अवतार होता.  
ALSO READ: Sant tukaram : संत तुकाराम यांच्याबद्दल 5 खास गोष्टी
देहू मध्ये ज्याठिकाणी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तो वृक्ष आज देखील साक्ष देत तठस्थपणे उभा आहे. व इतिहासाची साक्ष देत आहे.    

श्री तीर्थक्षेत्र देहू जावे कसे?
पुणे जिल्ह्यातील देहू येथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक सोयी उपलब्ध आहे. पुण्यापासून देहू हे गाव साधारण २९ किमी अंतरावर आहे. पुणे शहरात गेल्यानंतर तुम्ही रेल्वे किंवा खासगी वाहन, बस, कॅब यांच्या मदतीने देहू गावात सहज पोहचू शकतात. तसेच देहू गावाजवळून सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. विमानतळवुन तुम्ही कॅबच्या मदतीने देहू मध्ये सहज पोहचू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती