वडिलांमुळेच राजकारणात, अन्यथा कधीच आलो नसतो - अमित ठाकरे

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (09:08 IST)
facebook
सध्याच्या राजकारणाची स्थिती भयावह आहे. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलोच नसतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केलं आहे.
 
ते म्हणाले, "राजकारणाची सध्याची स्थिती पाहून मला राजकारणात यावंसं वाटलं नसतं. केवळ राजसाहेबांनी संधी दिल्याने मी राजकारणात आलो आहे."
 
अमित ठाकरे पुढे म्हणाले, "सध्या राज्याच्या राजकारणातील घडामोडी सर्वसामान्यांना न पटणाऱ्या आहेत. एकाच दिवशी दोन मोठमोठ्या सभा घेणे, मात्र त्यात सर्वसामान्यांसाठी काहीही विधायक नसणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी क्लेशदायक आहे. दररोज एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे राजकारण नकोनकोसं झालं आहे." ही बातमी ई-सकाळने दिली.

Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

पुढील लेख