राज ठाकरे यांना भाजपबरोबर यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल: चंद्रकांत पाटील

शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:17 IST)
मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
चंद्रकांत पाटील यांच्या आधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सत्तेच्या खुर्चीसाठी ते एकत्र येऊ शकतात तर सत्यासाठी आम्ही का एकत्र येऊ शकत नाही? असं म्हणत मनसेसोबत युतीचे संकेत दिले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती