पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्यागिर गावातील 24 मजूर आपल्या मुलांसह M.H. 25 P 3770 क्रमांकाच्या गाडीमध्ये उस्मानाबादला ऊसतोडीसाठी चालले होते. धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपुढील विंचूर शिवारातील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीपात्रात पडली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला."