शपथविधीवेळी 'नियमांकडे दुर्लक्ष केल्यावरून' राज्यपालांची नाराजी

शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (09:41 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या शपथविधीच्या पद्धतीवर राज्याच्या राज्यपालांनी नाराजी वर्तवली आहे.  
 
नियम आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन करत आमदारांनी राज्यपालांकडून शपथ सुरू करण्यापूर्वी आपापले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले तर कुणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे स्मरण केले. सूत्रांनुसार, पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या राज्यपालांनी सूचना दिल्या आहेत.
 
शपथ घेताना राज्यपाल मी... शब्दाने सुरुवात करतात, यानंतर मुख्यमंत्री/मंत्री आपले नाव घेऊन शपथ घेतात.
 
बहुतेक नवनियुक्त मंत्र्यांनी राज्यपालांच्या वतीने शपथविधी सुरू करताना त्यांना मध्येच थांबवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती