सिंह-स्वाभाविक गुणदोष
आपण आपल्या वर्तमान काळापेक्षा आपल्या भूतकाळाकडे व ‍भविष्य काळाकडे अधिक लक्ष देता व यामुळे आपण बर्‍याचदा नको असलेल्या स्थितीत फसू शकता. आपल्याला राग लवकर येतो व आपल्या मनात लोकांनी आपली प्रशंसा करावी अशी इच्छा फार बळावते. कधीकधी ही इच्छा आपल्याला स्वार्थी बनवते व आपल्या सहयोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. सिंह राशिचे लोक वर्तमान काळाचा विचार करण्यापेक्षा भूतकाळाचा जा्स्त विचार करतात. हे लोक स्वत:च आपल्यासाठी कष्ठ निर्माण करतात. ते फार शंकाळू असतात. या राशिचा स्वामी सूर्य असल्याने अग्नितत्व प्रधान करत असतो. त्यामुळे हे प्रत्येक गोष्टी गोष्टीत अत्यधिक क्रोधीत होत असतात. यावर उपाय गुरुवारी उपवास धरावा. दत्त, रामकृष्ण, हनुमान, शक्ति व गायत्रीदेवी यांपैकी कोणत्याही एका देव दे‍विताची उपासना करावी. गणेशपुजा शुभ मानली जाते. गहू गुळ लाल पुष्प, लाल चंदन, तांबा तसेच लाल वस्तुंचे दान करणे शुभ मानले जाते. ॐ ह्रा ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः - हा मंत्र 7,000 वेळा जाप करा मनोकामनेची पूर्ति होईल.

राशि फलादेश