
सिंह-आरोग्य
या राशिचे लोक दिसायला बारीक असतात पण त्यांची काम करण्याची शक्ती अफाट असते. या राशिच्या लोकांच्या जीवनात जास्त कष्ट आहेत. गळा पोट डोळे यांचा त्रास तसेच रक्त विकार कानाचा त्रास चर्म रोग वात रोग यांचा त्रास होण्याची भिती नेहमी असते. यांना सर्दी लवकर होते. बाल्यावस्थेत त्यांना अनेक आजार होत असतात. मात्र युवा अवस्थेत ते जास्त बलवान असतात. अधिक पाणी पिणे या राशिच्या लोकांसाठी लाभदायक आहे. ताक दही कोबी बटाटा टोमँटो व आंबा हे त्यांचे विशेष आवडत्या खाण्याच्या गोष्टी.