ऍसिडिटी पासून मुक्त होण्यासाठी हे आसन करावे

शुक्रवार, 25 जून 2021 (18:07 IST)
योगासनांमुळे प्रत्येक समस्येवर उपचार करणे शक्य आहे.आहार आणि दिनचर्येत बदल झाल्यामुळे बहुतेक लोक ऍसिडीटीने ग्रस्त असतात.अशा परिस्थितीत हे काही आसन केल्याने या त्रासापासून मुक्त होऊ शकता.चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे ते आसन.
 
 
1 पश्चिमोत्तानासन-पश्चिमोत्तानासन किंवा पुढे वाकून केले जाणाऱ्या या आसना मुळे पोटाचे अवयव व्यवस्थितरीत्या काम करतात.हे आसन केल्याने बरेच फायदे मिळतात.हे आसन प्रामुख्याने ऍसिडिटीशी निगडित सर्व समस्यांना बरे करण्याचे कार्य करतो.हे आसन स्त्रियांच्या मासिक पाळीला नियमित करून पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतो.
 
2 हलासन -हलासन हे आसन नांगराच्या मुद्रेसाठी ओळखला जातो.हल हे संस्कृतचे रूप आहे आणि आसन चा अर्थ संस्कृत मध्ये मुद्रा आहे.हे आसन केल्याने स्नायू आणि पाठीचा कणा बळकट होतो आणि शरीरात लवचिकता येते.हे आसन खांदा आणि स्नायूंच्या तणावाला कमी करण्यासाठी प्रभावी आहे.हे पचन क्रियेत सुधारणा करते.वजन कमी करण्यात देखील हे प्रभावी आहे.
 
3 वज्रासन-हे आसन योगासन आहे.हे जेवण्याच्या पूर्वी किंवा नंतर केले जाऊ शकते.हे आसन ऍसिडिटीच्या त्रासाला कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.कारण हे आसन पचनक्रियेत सुधारणा करण्याचे काम करते.सूज कमी करण्याचे काम करते.तसेच पोटाचे इतर त्रास देखील दूर करण्यात मदत करतो.
 
4 पवन मुक्तासन -हे आसन ऍसिडिटीला कमी करण्यासाठी एक बलिष्ठ आसन आहे.हे पोटाचे अवयव आणि इतर अंगांची मॉलिश करतो,हे बद्धकोष्ठता आणि गॅस सारखे त्रास कमी करण्यात उपयुक्त आहे.पोटाच्या स्नायू आणि पाठीचा खालील भाग मजबूत करतो.याचे अनेक फायदे आहे.कुल्ह्याच्या संधामधील तणाव कमी करण्याचे काम करतो.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती