आजच्या काळात आपण स्क्रीनवर 9 तासांपेक्षा जास्त वेळ घालवता .यामुळे डोळ्यांची समस्याही वाढली आहे. संगणकानंतर, लोक थेट मोबाइल देखील हाताळतात.यामुळे डोळ्यांवर ताण येणं साहजिक आहे. डोळ्याच्या त्रासाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे काही साधे उपाय आहे. ज्यांना अवलंबवून आपण डोळ्यांना आराम देऊ शकता. हे व्यायाम आपण ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून देखील करू शकता.
1 डोळ्यांची हालचाल- आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये सतत बघत असतो. काही वेळ जरी डोळ्यांची हालचाल केली तर डोळ्यांना त्रास होऊ लागतो. आपण आरामशीर खुर्चीवर बसा, आपल्या समोर घडी ठेवली आहे असा विचार करा. सर्वप्रथम डोळे 12 वाजेच्या दिशेने फिरवा नंतर 6 वाजेच्या सुई कडे बघून डोळे फिरवा.
2 उजवी-डावी,वर-खाली हालचाल करा- डोळे स्थिर ठेवा. नंतर 9 वाजेच्या सुई वर डोळे ठेवा नंतर काट्यासह डोळे फिरवा. 3 वर डोळे ठेवा आणि सुईसह डोळे फिरवा. त्याच क्रमाने 11,2 4,7 च्या सुईवर वर डोळे केंद्रित करा नंतर फिरवा.