घरातच ट्रेडमिल वर्क आउट करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

रविवार, 27 जून 2021 (17:59 IST)
बऱ्याच काळापासून जिम बंद आहे.या परिस्थितीत लोकांनी घरातच वर्क आउट करणे सुरु ठेवले आहेत.त्यांनी स्वतःच्या घरात लहान जिम तयार केले आहेत.जेणे करून वर्क आउट करताना काही त्रास होऊ नये.जर आपण देखील घरात ट्रेडमिल सुरु करत आहात तर या गोष्टींची काळजी घ्या.
 
* असे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीने नवीन ट्रेडमिलच विकत घ्यावे. बरीच लोक अशी आहेत ज्यांनी जुने ट्रेडमिल विकत घेतलेले आहे.अशा लोकांनी विकत घेतांना त्याचे मोटार आणि शॉकर तपासून घ्यावे.जेणे करून त्यामध्ये कोणतीही समस्या येऊ नये.
 
* व्यायाम करताना सरळ ट्रेडमिल वर चढू नये.हे आपल्याला त्रासदायक होऊ शकते.कारण व्यायाम करताना आपल्या गुडघ्यांवर दाब पडतो.म्हणून जर आपण ट्रेडमिल वर व्यायाम करत आहात तर प्रयत्न करा की 10 मिनिटाचे वर्कआउट सेशन आधीच करून घ्या.
 
* ट्रेडमिलच्या गतीला घेऊन एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाशी बोला.सुरुवातीस त्याच गती वर व्यायाम करा.नंतर चांगला सराव झाल्यावर याची गती वाढवा  किंवा कमी करा.
 
* ट्रेडमिल ला घाबरू नये म्हणजे सेफ्टीबारच्या मदतीनेच व्यायाम करू नये असं केल्याने पोश्चर वर परिणाम होऊ शकतो.तसेच आपल्या गुडघ्याला , पायाला किंवा शरीराच्या इतर कोणत्याही अवयवाला दुखापत होऊ शकते.म्हणून संपूर्ण वेळ सेफ्टीबार धरूनच व्यायाम करू नका.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती