जौहर टाउनमध्ये घडली स्फोटची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना ऑटोरिक्षा आणि खासगी कारमध्ये लाहोरच्या जिन्ना रुग्णालयात नेण्यात आले होते, असे मदत कामगारांचे म्हणणे आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
मोटरसायकलमध्ये स्फोट
अद्याप स्फोटाचा प्रकार कळू शकला नाही. मात्र एका प्रत्यक्षदर्शीने जिओ टीव्हीला सांगितले की, एका व्यक्तीने मोटरसायकल घराबाहेर सोडली आणि नंतर त्यात स्फोट झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून तपास सुरू केला आहे. परिसरात वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे. स्थानिक सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती मिळेपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. असंही सांगितलं जात आहे की, आधी गॅसची पाइपलाइन फुटली असावी आणि त्यानंतर IED चा स्फोट झाला.