लॉकडाउन वाढला आहे आणि या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी ही पद्धत देखील उत्तम आहे.कीआपल्या घरात बसणे. लॉकडाउन वाढल्यामुळे आपण आपल्या प्रियजनांबरोबर घरी आणखी काही वेळ घालवू शकता आणि ही वेळ संस्मरणीय बनवू शकता. पण फिटनेसचं काय? फिटनेस कडे लक्ष देणं देखील महत्त्वाचे आहे. या साठी आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण अधिकच फिट आणि सक्रिय व्हाल.चला तर मग जाणून घेऊ या.
* जंपिंग जॅक -
हे व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच तणाव देखील कमी होत.हा व्यायाम करण्यासाठी, सर्वप्रथम उभे रहा. आता वरच्या दिशेने उडी घ्या आणि आपले हात देखील वर करा आणि त्याच बरोबर पाय देखील पसरवा. जेव्हा आपण खाली येता तेव्हा सामान्य स्थितीत परत या. हा व्यायाम 2 ते 3 मिनिटां पर्यंत पुन्हा करा.